Family Law with Adv.Deepak Sable

आपल्या कायदेशीर हक्कांसाठी योग्य सल्ला घ्या.

अ‍ॅडव्होकेट दिपक साबळे यांच्याबद्दल...

अ‍ॅडव्होकेट दिपक साबळे हे एम.ए., एल.एल.बी. शिक्षण घेऊन कायद्याच्या क्षेत्रात कार्यरत असलेले एक प्रगल्भ आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व आहे. वकिलीच्या माध्यमातून ते समाजातील पीडित, अन्यायग्रस्त आणि दुर्लक्षित घटकांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने झटत असतात. त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू म्हणजे कौटुंबिक कायदा – घटस्फोट, 498A, मुलांची कस्टडी, निर्वाहभत्ता, आणि घरगुती हिंसाचार यांसारख्या विषयांवर त्यांनी दोन्ही बाजूंना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक संघर्ष केले आहेत.

वकील असण्यासोबतच, दिपक साबळे हे एक अनुभवी पत्रकार म्हणूनही ओळखले जातात. तब्बल दहा वर्षे त्यांनी पत्रकारितेमध्ये काम करत समाजातील विविध सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकला आहे. अन्याय, अत्याचार, प्रशासनातील त्रुटी, गरिबी, लाचलुचपत, महिला अत्याचार, आणि शिक्षणातील असमतोल यांसारख्या विषयांवर त्यांनी आवाज उठवला आहे. पत्रकारितेच्या अनुभवामुळे त्यांना सामाजिक वास्तवाचे जाणिवपूर्वक भान निर्माण झाले, जे त्यांच्या वकिलीच्या प्रवासात त्यांना अधिक संवेदनशीलतेने प्रकरण हाताळण्यास मदत करते.

दिपक साबळे हे फक्त कायद्याचे व्यावसायिक नाहीत, तर समाजातील प्रश्नांवर सतत विचार करणारा आणि त्यावर कृतीशील भूमिका घेणारा एक सजग नागरिक आहेत. ते सामाजिक घडामोडींवर सतत लक्ष ठेवून असतात आणि गरज भासल्यास, सामाजिक माध्यमातून जनतेपर्यंत आपला आवाज पोहोचवत असतात. त्यांनी अनेक वेळा पीडित पुरुषांसाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि कायद्याविषयीच्या गैरसमज दूर करण्यासाठी विविध व्यासपीठांवरून जनजागृती केली आहे.

कोरोना काळातही त्यांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखत अनेक गरजूंना मदत केली. अन्नदान, मोफत कायदेशीर सल्ला, आणि गरजू कुटुंबांना मदत यांसारख्या उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या कामाची पारदर्शकता, माणुसकीची हातभार आणि सत्यासाठी उभं राहण्याची वृत्ती यामुळे आज अनेक लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात.

दिपक साबळे यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे वकिली, पत्रकारिता आणि समाजसेवेचा त्रिवेणी संगम आहे. आज ते हजारो लोकांसाठी एक मार्गदर्शक, आधारवड आणि प्रेरणास्थान ठरले आहेत. त्यांच्या कार्यातून एक संदेश नेहमीच उमटतो – "न्याय हा केवळ कायद्याचा विषय नसून तो माणुसकीचा ही आहे."

मुख्य कायदेशीर सेवा

घटस्फोट, कस्टडी, आणि हिंसाचार याबद्दल सल्ला व कायदेशीर सेवा.
man writing on paper
man writing on paper
घटस्फोट सल्ला

🔹 घटस्फोट घेताना कायदेशीर प्रक्रिया समजावून घेणे आवश्यक असते. आम्ही परस्पर संमतीने (Mutual Divorce) आणि एकतर्फी (Contested Divorce) अशा दोन्ही प्रकारच्या घटस्फोट प्रकरणांमध्ये मदत करतो.

निर्वाहभत्ता (Maintenance Cases - CrPC 125, HMA 24 & 25)

🔹 घटस्फोटानंतर किंवा वेगळं राहत असताना पुरुष किंवा महिलांना निर्वाहासाठी आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी कायदेशीर मार्गदर्शन आणि केस हाताळतो. CrPC 125, HMA 24 आणि HMA 25 अंतर्गत योग्य हक्क मिळवून देण्यासाठी मदत करतो.

498A आणि खोट्या आरोपांपासून संरक्षण
(False 498A Cases Defense)

🔹 498A अंतर्गत होणाऱ्या खोट्या आरोपांपासून बचाव करण्यासाठी योग्य कायदेशीर उपाय महत्त्वाचे आहेत. आम्ही खोट्या गुन्हेगारी प्रकरणांपासून बचाव करण्यासाठी पुरावे गोळा करण्यापासून न्यायालयीन प्रक्रिया हाताळण्यापर्यंत संपूर्ण मार्गदर्शन करतो.

मुलांची कस्टडी (Child Custody Cases)

🔹 घरगुती हिंसाचाराच्या शिकार झालेल्या पुरुष आणि महिलांना कायदेशीर मदत पुरवतो. मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि अन्य प्रकारच्या हिंसाचाराविरुद्ध संरक्षण मिळवण्यासाठी योग्य न्यायालयीन प्रक्रिया हाताळतो.

🔹 आई-वडिलांमध्ये घटस्फोट किंवा विभक्त राहिल्यास, मुलांच्या हक्कांसाठी योग्य निर्णय होणे आवश्यक असते. आम्ही पालकांना कायदेशीर प्रक्रिया समजावून देऊन त्यांच्या मुलांच्या हितासाठी लढण्यास मदत करतो.

घरगुती हिंसाचार (Domestic Violence Cases - DV Act 2005)

अ‍ॅडव्होकेट दिपक साबळे यांचे कायदेशीर मार्गदर्शनपर लेख / ब्लॉग्स

विविध पुरस्कार आणि सन्मान

अ‍ॅडव्होकेट दिपक साबळे यांना विविध संस्था आणि मिडिया हाऊसेसकडून त्यांच्या समाजोपयोगी कार्याबद्दल अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.
त्यांच्या सामाजिक भान आणि कायदेशीर योगदानाची दखल घेऊन त्यांना प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

अ‍ॅडव्होकेट दिपक साबळे यांचा सल्ला अत्यंत उपयुक्त आणि व्यावसायिक होता. मी खूप समाधानी आहे.

राहुल वाघमारे, नाशिक

★★★★★

अभिप्राय आणि धन्यवाद

अ‍ॅडव्होकेट दिपक साबळे यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे माझ्या घटस्फोट प्रकरणाचा योग्य निर्णय झाला

★★★★★

अनामिक

black wooden d and c bookshelf

संपर्क साधा

तुमच्या कायदेशीर समस्यांसाठी त्वरित मदत हवी आहे? खालील फॉर्म भरा किंवा थेट कॉल करा. आम्ही लवकरात लवकर तुमच्याशी संपर्क साधू.